हापूस आंब्याचा हंगाम यंदा घेऊन पर्यंत लागणार

Payal Bhegade
15 May 2024
Blog

हापूस ही एक आंब्याची जात आहे. हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी आणि देवगड परिसरातील मिळणारा आंबा आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी मे च्या अखेरीस हापूस आंब्याचा हंगाम संपुष्टात येतो . मात्र यंदा उशिराने मोहर आलेला असल्याने कोकणातील हापूस आंबा तयार होण्यासाठी मी अखेर उजाडणार आहे .
त्यामुळे यंदा हापूस आंब्याचा हंगाम जुनचा पहिला आठवडा किंवा 10 जून पर्यंत राहील असा अंदाज बागायतदारांनी वर्तवला आहे .
मी अखेरीस बाजारात येणारा हापूस आंबा हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल सद्यस्थितीत या दोन्ही जिल्ह्यातून वाशी बाजार समितीत येणाऱ्या हापुसची आवक खूप कमी झाली आहे..
सध्या डचनासाठी ,४०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. सध्या आंब्याला दर देखील चांगला मिळत आहे चार डझनचा मोठा हापूस आंबा एका पेटीत दोन ते अडीच हजार रुपये भाव आहे.
आकाराने खायचे छोटा हापूस चार डझनच्या पेटीला एक ते दीड डझन भाव मिळत असल्याचे बागातदारांनी सांगितले. दरम्यान यंदा हापूस हंगाम चांगला असून शेवटच्या टप्प्यात नाही. अजून महिनाभर हा हंगाम असेल.
दरही कमी झाले आहेत अवकाळी पाऊस आणि मार्च शेवटपर्यंत असलेली थंडी यामुळे फळधारणा पुन्हा झाली त्यामुळे आंबा हंगाम पुढे गेला असे आंबा बागायतदार यांनी सांगितले.