कोकण विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

Payal Bhegade
24 Nov 2023
Blog

अलिबाग । रायगड पोलीस विभागातर्फे सरखेल कान्होजी आंग्रे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय अलिबाग येथे आयोजित 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री यांच्याहस्ते ज्योत पेटवून व हवेत फुगे उडवून उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा नवी मुंबई , अपर पोलीस अधीक्षक , उप वनसंरक्षक आदींसह पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री म्हणाल्या की, 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 रायगड जिल्ह्यामध्ये संपन्न होत असून रायगडकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस विभागाचे क्रीडा क्षेत्राशी अतुट व जिव्हाळयाचे नाते आहे. पुढील काळात अधिकाधिक चांगले खेळाडू तयार होवून पोलीस विभागाचे नाव उंचवावे. पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना वर्षांचे बारा महिने कार्यरत राहावे लागते.

या तीन दिवसीय पोलीस क्रीडा स्पर्धेत पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांचे व पोलीस विभागाचे अभिनंदन करते. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना गोपनीयतेची शपथ देण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यानी केले तर आभार प्रदर्शन अतुल झेंडे यांनी मानले.