तळेरे : ‘आपला संकल्प, विकसित भारत’ या संकल्प यात्रेत कासार्डे ग्रामपंचायत येथे माहिती देण्यात आली. हे अभियान १५ नोव्हेंबर ते २६ जानेवारी कालावधीत होणार आहे.
‘आपला संकल्प, विकसित भारत’ या संकल्प यात्रेचे कासार्डे येथे बुधवारी आगमन झाले. या यात्रेचे कासार्डेवासियांकडून स्वागत करण्यात आले. या यात्रेदरम्यान आतापर्यंत लाभ मिळाला नाही अशा नागरिकांपर्यंत पोहचणे, माहितीचा प्रसार व योजनेबद्दल माहिती देऊन नागरिकांशी संवाद, अनुभव तसेच या लाभार्थ्यांची नोंदणी करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते, माजी सरपंच संतोष पारकर, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस अधिकारी बाळकृष्ण गावडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहा कांबळी, आरोग्य अधिकारी डॉ. सिद्धी पालांडे, सामाजिक कार्यकर्ते संजय पाताडे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, सोसायटी चेअरमन दिपक सावंत, दिपक पाताडे, दादा घाडी, श्रीरंग पाताडे, सत्यवान आयरे, केंद्रमुख्याध्यापक दिपक पवार, श्री. नानचे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाताडे, अभिजित धुमाळ, जयवंती जमदाडे, श्रद्धा शेलार, आरोही जाधव, आरोग्य सेविका दर्शना धुरे, तलाठी गोडे, संकल्प यात्रा प्रतिनिधी सागर दुतोंडे, बचतगट प्रवर्तक परब, शारदा आंबेरकर आणि अंगणवाडी सेविका, आशा सेविका ग्रामपंचायत सदस्य, कासार्डे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रकाश पारकर, शेतकरी संघाचे संचालक श्रीपत पाताडे, डॉ. सिध्दी पालांडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहा कांबळी, कृषी विज्ञान अधिकारी बाळकृष्ण गावडे, सरपंच निशा नकाशे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध प्रात्यक्षिके सादर करीत आपला संकल्प विकसित भारत यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
आपला संकल्प, विकसित भारत'' यात्रेत कासार्डेत विविध योजनांबद्दल माहिती