कर्जत । कर्जत तालुका कृषी विभागाचे वतीने नेरळ जवळील ममदापूरवाडी येथे कृषी विभाग आणि स्थानिक आदिवासी यांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले. तर मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया अंतर्गत प्रोसेसिंग विभगाची पाहणी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
नेरळ ग्रामपंचायत मधील मोहाची वाडी येथे मुख्यमंत्री कृषि व अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत प्रवीण फूड्स मधील उत्पदित विविध पदार्थ बनविणार्या युनिट चालवले जात आहे. तरुण उद्योजक क्षीरसागर यांनी उभ्या केलेल्या फळांच्या अर्कपासून बनविण्यात येत असलेल्या विविध सरबते आणि अन्न प्रक्रिया केंद्राची पाहणी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केली.
पायरमाळ येथे मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया अंतर्गत वैष्णवी बचतगट यांचेमार्फत उत्पादीत पासून तयार विविध सरबते आणि इतर अन्नप्रक्रिया युक्त सरबते यांची पाहणी आणि शेतकर्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले मॅडम, कृषी उपसंचालक सतिश बोर्हाडे, उप विभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर आदी प्रमुख उपस्थित होते.
त्यानंतर ममदापूर ग्रामपंचायत मधील ममदापूरवाडी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी यांनी तेथील नाल्यावर वनराई बंधारा बांधला. श्रमदानातून वनराई बंधारे बांधकाम आणि नंतर कोंबडवाडी बचत गट यांनी तयार करावयाच्या सामूहिक शेततळे चालु कामाची पाहणी आणि मार्गदर्शन केले.
यावेळी कर्जत भात संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रवींद्र मर्दाने, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुमार कोळी, तालुका कृषी पर्यवेक्षक मंगेश गलांडे, सचिन केने, संदीप लाळ, कृषी सहायक विजय गंगावणे, तसेच आनंद खरे आणि महेश साळवी उपस्थीत होते.
कृषी विभागाकडून वनराई बंधारे बांधण्यासाठी श्रमदान