श्री कृष्ण जन्माष्टमी

Payal Bhegade
06 Sep 2023
Festival

श्री कृष्ण जयंती / गोकुळाष्टमी
भगवान श्रीकृष्णांचा जन्म, हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला, रोहिणी नक्षत्रावर, मथुरेमध्ये कंसाच्या बंदी शाळेत झाला होता. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून आपण हा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. गोविंद, बाळ गोपाळ, कान्हा, कन्हैया, गोपाळ, केशव, कृष्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाच्या जन्मसणाचा इतिहास, या सणाचे महत्त्व, हा सण आपण का साजरा करतो?

आपला भारत देश हा धार्मिक परंपरांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपल्या देशामध्ये सगळे सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण जयंती, म्हणजेच गोकुळाष्टमी. श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भाऊ कंसाचा अत्याचार सहन करणारी त्याची बहीण देवकी हिने, आठवे अपत्य म्हणून भगवान श्रीकृष्णाला जन्म दिला. पृथ्वीला कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशती पासून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला होता. या आख्यायिकेनुसार दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो.

हिंदू धर्मातील महत्वपूर्ण सणांपैकी एक म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी भगवान कृष्णाच्या भक्तीसाठी लोक उपवास करतात. आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी भगवान कृष्ण ला प्रार्थना करतात. कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे रात्री कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. त्यानंतर कृष्णाची गाणी, पाळणे म्हणून पाळण्याला झोका दिला जातो. पूजा अर्चा करून प्रार्थना केली जाते.
ज्या ज्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो त्या त्या ठिकाणी फुलांची, दिव्यांची आरास केली जाते. कृष्णाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप केले जाते. नाच गाण्यांनी संपूर्ण रात्र जागवली जाते. दुसऱ्या दिवशी पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवला जातो. ठिकठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले जातात. त्यानंतर काला करून कृष्णाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद वाटप करून नंतर कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

श्रावण कृष्णपक्ष अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून हा सण श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान कृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला ती जयंती म्हणजेच “श्रीकृष्ण जयंती”. या सणाला गोकुळाष्टमी, जन्माष्टमी अशी देखील नावे आहेत. गोकुळामध्ये गाईंचे पालन करणाऱ्या कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला होता. म्हणून या सणाला “गोकुळाष्टमी” असे देखील म्हटले जाते. श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान कृष्णांचा जन्म झाला होता. म्हणून हा सण “जन्माष्टमी” म्हणून साजरा करतात.

श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी व्रतवैकल्य केले केले जाते. ज्या ठिकाणी कृष्णाची पूजा केली जाते, ते ठिकाण फुलांनी तसेच दिव्यांनी सुशोभित केले जाते. त्यानंतर कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याच्याच बाजूला वसुदेव आणि देवकी यांच्या देखील मूर्ती बसवल्या जातात. अष्टमीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवला जातो.
वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
भगवान विष्णू कृष्णाच्या रूपामध्ये सृष्टीच्या कल्याणासाठी तसे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि या पृथ्वीला पापांपासून मुक्त करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊन आपला आठवा अवतार धारण केला.

श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या दिवशी मध्यरात्रीच्या वेळेस मथुरा नगरीत कंसाच्या कारागृहात देवकीच्या गर्भातुन श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. असे म्हटले जाते की, द्वापर युगात पृथ्वीवर जेव्हा राक्षसांचे अन्याय अत्याचार हे वाढत होते, तेव्हा पृथ्वी मातेने गाईचे रूप धारण करून ती ब्रम्हा अणि विष्णु या दोघांकडे भेटीस जाते.अणि पृथ्वी माता ब्रम्हा अणि विष्णु या दोघांना पृथ्वीवर राक्षसांकडून मानव जातीवर होत असलेल्या सर्व अन्याय अत्याचारा बद्दल सांगते.तेव्हा ब्रम्हदेव हे विष्णुंना म्हणतात हे प्रभु पृथ्वीचे रक्षण करायला आपला आठवा अवतार धारण करायची वेळ आता आली आहे .तेव्हा विष्णु म्हणतात, ठिक आहे. पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अणि राक्षसांपासुन तिचे रक्षण करायला, पापींचा, अत्याचारींचा संहार करण्यासाठी
मी मानव रूपात नक्की जन्म घेईल.

हिंदु मान्यतेनुसार देखील भगवान विष्णुच्या दहा अवताराविषयी सांगितले गेले आहे. जेव्हा जेव्हा ह्या सृष्टीवर पाप वाढेल, अन्याय, अत्याचार वाढेल तेव्हा राक्षसांचा संहार करण्यासाठी ते जन्म घेतील.
श्रीकृष्ण देखील भगवान विष्णु यांच्या दहा अवतारांपैकी एक आहे.
भगवान विष्णुंच्या ह्या कृष्ण अवताराची निर्मिती कंस नावाच्या नराधम, पापी अत्याचारी राक्षसाचा अंत करणे यासाठी झाली होती.
म्हणजेच कंस नावाच्या पापीचा अंत करणे, अत्याचारी, दुराचारी नराधम राक्षसाचा वध करण्यासाठी पृथ्वीला कंस नावाच्या राक्षसापासुन मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर एका बालकाच्या रूपात जन्म घेतला होता.
म्हणून कृष्णाच्या जन्मनिमित्त हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गोकुळाष्टमी कशी साजरी केली जाते?
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला मथुरा नगरीमध्ये कंसाच्या कारागृहात देवकीने ज्या आठव्या अपत्याला जन्म दिला ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. त्यांच्या जन्माचा दिवस हा जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. परदेशात राहणारे भारतीय लोक सुद्धा ही गोकुळाष्टमी धुमधडाक्यात साजरी करतात.
या दिवशी भक्त गोकुळाष्टमीचा उपवास करतात. या दिवशी त्या त्या ठिकाणच्या मंदिरांना संपूर्ण फुलांनी दिव्यांनी सजवले जाते. तसेच गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. यानंतर भजन, कीर्तन केले जातात. त्यानंतर नाच गाण्यांचा कार्यक्रम देखील केला जातो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा सुरू असते. संपूर्ण भारतभरातून भक्त दर्शनासाठी येत असतात.
भगवान श्रीकृष्णाचे दही हे आवडते होते. तो आपल्या मित्रांसोबत लोणी, दही, दूध चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असे. म्हणून त्याच्या या आठवणींना दहीहंडी महोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाला काला असे म्हणतात. दही काल्याच्या दिवशी भगवान कृष्णाला नैवेद्य दाखवून उपवास सोडून सोडला जातो. नैवेद्याचा काला सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटप करून त्यानंतर भगवान कृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

महाराष्ट्र –
महाराष्ट्र मध्ये कृष्णजन्म हा गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात. रात्री बारा वाजता कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्यानंतर दही दुधाचा प्रसाद दाखवून त्यानंतर कृष्ण जन्मावर आधारित पाळणे, गवळण, गाणी म्हणून कृष्णाची पूजा आणि आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कृष्णाचे आवडते दही आणि पोहे, लाह्या यासारखे बरेच पदार्थ एका हंडीमध्ये भरून दहीहंडी वरती अडकवली जाते. त्यानंतर गोविंदा पथक थरावर थर लावून हंडी फोडतात. जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हे हंडी फोडतात, त्यांना ठराविक रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.