गणपती उत्सवापूर्वी कोकण रेल्वेने पहिली रो-रो कार ट्रेन चालवली

Rohini
29 Aug 2025
Blog

महाराष्ट्र सरकार ने कोकणवासियांसाठी आपल्या चार चाकी गाडी कोकणात नेण्यासाठी रो रो कार ट्रेनसेवा सुरु केली आहे.रायगड जिल्ह्यातील कोलाड स्थानकावरून दहाव्या आणि दोन प्रवासी कोच असलेली पहिली रो रो कार ट्रेन पाच डबे आणि नऊ प्रवाशांसह निघाली. आहे.उत्सवाच्या काळात गर्दी कमी करण्यासाठी जड वाहनांवर निर्बंध घालण्यासाठी कोकण रेल्वेने पहिल्यांदाच रो रो कार ट्रेन सेवा चालू केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जादाच्या बसेस सोडून कोकणातील जास्तीत जास्त लोक घरी जाण्यासाठी सोय केली आहे ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के महिलांना 50 टक्के सवलीत दिले आहे.23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व वाहनांना एसटी बसेस सह टोल माफ करण्याची घोषणा सरकारने दिली आहे आरटीओ पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाकडून गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन हा विशेष पास जारी केला आहे.
कोकणात घरी परतणारे लोक, मोठ्या प्रमाणात परताण्यासाठी भारतीय रेल्वेने 27 ऑगस्ट पासून 262 विशेष गाड्या चालवणार आहेत या व्यतिरिक्त 60 दिवसांचा अगाऊ बुकिंग नियमानुसार 20 - 23 जून पासून नियमित रेल्वे आरक्षण चालू झाले आहे. कोकणात पोहोचण्यासाठी सर्वात जास्त गर्दीचे दिवस म्हणजे 25 आणि 26 ऑगस्ट आहे.
कोकणातील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रवास. कामानिमित्त बाहेरगावी गेलेले कोकणातील लोक गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात परतताना दिसतात गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025 ला सुरू होत आहे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अकरा दिवसांचा उत्सव सुरू होतो व त्याचा समारोप शनिवार सहा सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीला विसर्जन होतो स्थानिक रित्या चाकरमनी म्हणून ओळखले जाणारे कोकणातील उत्सव परंपरेत खोलवर रुजलेले आहेत आणि कुटुंबे चिकन माती नावाच्या विशेष विरघळणाऱ्या माती पासून बनलेली मूर्ती घरी आणतात जी वाहतुकी दरम्यान लवचिकता आणि विसर्जनात सहजतेसाठी ओळखली जाते.
कोकणातील सणांची मजाच काही और आहे. शिमगा असू दे किंवा गणपती बाप्पाचा आगमन, कोकणातील कामानिमित्त बाहेर गेलेले सर्वजण सणानिमित्त एकत्र येतात. एकत्र येऊन सण उत्सव साजरी करतात. पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे गावागावात आगमन होते. कोकणात काही ठिकाणी डोक्यावरून तर काही ठिकाणी होडीतून लाडक्या बाप्पाला घरी आणले जाते. महिला आणि लहान मुलंही उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले दिसतात.
सरकारने सुरू केलेली ही रोरो कार ट्रेन सेवा सर्वांना उपयुक्त ठरणार आहे.