आपल्या महाराष्ट्राला लाभलेले *फणसकिंग*
रत्नागिरी जिल्ह्यातील, लांजा तालुक्यातील झापडे ह्या गावात श्री हरिश्चंद्र देसाई ज्यांना अक्खा महाराष्ट्र *फणसकिंग* म्हणून ओळखतो व त्यांच्या सोबत त्यांच्या मुलगा मिथिलेश देसाई (B. Tech Agriculture Engg, Rahuri) त्यांनी आगळी वेगळी अशी फणस लागवड केली आहे...
जगभरात फणसाच्या साधारण १२८ व्हरायटी आहेत त्यातील देसाई ह्यांनी ७२ व्हरायटी सध्या लावल्या आहेत, आणि मिथिलेश ह्याच द्येय अस आहे की किमान १२८ पैकी १०० व्हरायटी तरी लागवड करायची... देसाई ह्यांची सध्या तब्बल १२५० फणस झाडांची लागवड झाली आहे आणि इतक्या व्हरायटी आणि इतकी लागवड करणारे ते महाराष्ट्रातील, गोव्यातील आणि कर्नाटक मधील एकमेव शेतकरी आहेत... आता सर्वांना फणसाच्या फक्त दोन प्रकार माहिती आहेत, कापा म्हणजे कडक Shell वाला आणि बरका म्हणजे नरम Shell वाला फणस पण Commercially काप्या फणसाला खूप डिमांड असल्याने देसाई ह्यांची ७२ व्हरायटी आणि १२५० लागवड ही काप्या फणसाची आहे.... मग सगळ्यांना फणसाच्या गाऱ्याचा रंग पिवळा इतका माहिती आहे पण ह्यांच्याकडे भगवा, पांढरा, लाल, पिंक किंवा वर्षातून दोन वेळा येणारे फणस किंवा निर फणस अश्या वेग वेगळ्या जाती आहेत...
देसाई ह्यांच म्हणणं आहे, फणस फक्त थंड हवे च ठिकाण सोडल्यास सगळीकडे फणस येऊ शकतो म्हणजे सर्वांना वाटत की फणस फक्त कोकणात येतो तर तस नाही, देसाई ह्यांच्या कडील ७२ व्हरायटी पैकी संशोधन करून देसाई यांनी आशा काही व्हरायटी निवडल्या आहेत ज्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आशा सर्व विभागांमध्ये येऊ शकतात.... आणि फणस हे अस एक मेव झाड आहे जे पूर्ण पणे ऑरगॅनिक आहे, रासायनिक फवारणी नको व झाडाचं आयुष्य किमान १०० ते जास्तीत जास्त ३०० वर्ष इतकं आहे...देसाई ह्याचा नावाने म्हणजे देसाई कापा म्हणून कोकणातील त्यांनी विकसित केलेली फणसाची व्हरायटी केरळ राज्यात विकली जात आहे, आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे....
मिथिलेश ह्याचा अस म्हणणं आहे की लोकांनी किमान हळू हळू आता कोंकण सोडता महाराष्ट्राच्या वेग वेगळ्या भागांमध्ये फणसाची लागवड ट्रायल बेसिस वर सुरवात केली पाहिजे.. ह्यावर्षी पहिल्यांदाच देसाई ह्यांनी फणसाची नर्सरी सुरू केली असून तब्बल ३००० फणस झाड त्यांनी दिली असून ह्यावर्षी महाराष्ट्रात पहिल्यांदाच फणसाची लागवड झाली... मिथिलेश च म्हणणं अस आहे की, जस Jackfruit Mission for Kerala , JF Mission for Andhra, Jackfruit Mission for Meghalaya आहे तस अपल्याकडे *Jackfruit Mission for Maharashtra* सुरू केलं पाहिजे.... फणस हे अस फळ आहे ज्याच्या कडे फळ म्हणून न पाहता अन्न म्हणून पाहिल पाहिजे कारण फणस हे येत्या काळातील *Global Fruit* असणार आहे.... देसाई ह्यांचा ह्या प्रकल्पाला सरकार ची पाहिजे ती साथ मिळाल्यास मिथिलेश व त्या वडिलांना त्यांचा इथे *Jackfruit Research Centre* उभारायचा आहे,जेणे करून महाराष्ट्राला फणस लागवड करता येईल... येत्या काळात लवकरच त्यांचं स्वतः Food Processing Plant देखील सुरू होणार असून फणस हा Main Product ठेऊन बाकी Innovative Food Products राहणार आहेत....
धन्यवाद....
हरिश्चंद्र देसाई
फणसकिंग
आपल्या महाराष्ट्राला लाभलेले फणसकिंग