श्रीवर्धन समुद्रकिनारा(रायगड)
श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला 'श्रीधर' म्हटले जाते.. त्या ‘श्री’ च्या अस्तित्वामुळे वधर्न (वाढ) झालेले गाव म्हणजे ‘श्रीवर्धन’. या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस तांबडीचा डोंगर व पश्र्चिमेकडे समुद्र आहे. तर दक्षिणेस असलेल्या खाडीत हे गाव आखीव-रेखीव असे नटलेले आहे. श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनारा सुमारे 3 किलोमीटर लांब, अतिशय स्वच्छ आणि अतिशय शांत आहे. हे श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण आहे. समुद्रकिनाऱ्याभोवती फिरा आणि उत्साही वाटेल. अधूनमधून येणारी लाट तुमचे पाय धुवून टाकेल. सूर्यास्त विशेषतः आकर्षक आहेत. डुबकी मारणारा सूर्य, सोनेरी लाटा आणि अधूनमधून लाटा ओलांडणारी बोट हे पाहण्यासारखे आहे.
श्रीवर्धनमधली सुट्टी आणि त्यासाठी श्रीवर्धनमधला एक वीकेंड खास बनवता येईल कारण इथे पुणे आणि मुंबई जवळील तीन उत्तम किनारे आहेत - श्रीवर्धन-हरिहरेश्वर-दिवेआगर. एक मागे इतर एकमेकांपासून सुमारे 15 किमी अंतरावर हे समुद्रकिनारे मिळून रायगड समुद्रकिनारे बनतात. श्रीवर्धनमधील कोंदिवली समुद्रकिनारा देखील एक मासेमारी बंदर आहे -
खालचा जीवना बंदर आणि या मासेमारी गावातील जीवन पाहणे हा एक मोठा अनुभव आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा इतिहास :
श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्त्वाचे बंदर होते. सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते.
बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते.या परिसरात आढळून येणाऱ्या विष्णूमूर्तींमुळे हा परिसर शिलाहार राजवटीच्या आधिपत्याखाली असावा असे वाटते. कारण विष्णूच्या अशा केशव स्वरूपातील मूर्ती शिलाहार राजवटी जेथे होत्या, तेथे दिसून येतात. त्यांच्यावर थोडी दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. सोळाव्या शतकात श्रीवर्धन निजामाच्या ताब्यात होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होते.
श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो.सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे.दांडा येथुन हरिहरेश्वरला होडिने जाणे एक सुखद अनुभव आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर प्रसिद्ध आहे.सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाण आहे.जीवना बंदराच्या बाजूला जीवनेश्वर मंदिर असून, येथील गाभाऱ्यातील लाकडावरील कोरीव काम खूपच सुंदर आहे. कोळीवाड्यातील राम मंदिर हेही श्रीवर्धनचे आकर्षण आहे. विविध प्रकारच्या विष्णूमूर्ती हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. अशीच आणखी एक विष्णूमूर्ती बोर्लीपंचतन गावाकडे जाताना देवखोल येथे आहे. येथे कुसुमेश्वर मंदिर आहे. येथील मूर्ती भग्नावस्थेत असूनही, तिचे सौंदर्य पाहिले, की मूळ मूर्ती किती सुंदर असेल, असे वाटते. कुसुमेश्वराचा हरिहरेश्वर पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर पुरातन असावे याची खात्री पटते.
श्रीवर्धन समुद्रकिनारा
