कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चैतापुर जवळील हे जुवे बिच. चमचमणारे पाणी,नारळी पोफळीच्या बागा,अप्रतिम सौंदर्य लाभलेलं आणि चारीही बाजूंनी पाणी असणारे हे जुवे बिच.राजापूरची अर्जुना नदी अर्ध चंद्रकृती वळण जेथे घेते तिथे हा स्वर्ग उभा आहे.
अवघा १०४ घरांच आणि ७७ लोकांचं हे बेट आहे.१९७० सली ग्रामपंचायत या गावी आली.स्थापना झाल्यापासून या गावात एकदाही निवडणूक झाली नाही.गावकरी सर्वानुमते निर्णय घेऊन आपला प्रतिनिधी निवडतात.निसर्गाच्या सानिध्यात येथील लोक जीवन जगतात.१०४ घरे असूनही येथे केवळ ७७ लोकांची मनुष्य वस्ती आहे,बहुतांश घरे ही बंद आहेत.
तरी पण गणपती आणि शिमग्याला हे गाव गाजबजत.गावात एक शाळा देखील आहे.येथील लोकांना सर्वोतोपरी निसर्गावर अवलंबून राहावे लागते.हे बेट पर्यटकांकडून व शासनाकडून उपेक्षित आहे.शासनाने लक्ष घालून जर या बेटावर सुविधा पुरवल्या तर पर्यटकांना या सुंदर अशा स्वर्गाचा,निसर्गाचा आनंद घेता येईल.
येथील लोकांना नवीन रोजगार मिळेल,शहराकडे पोटापाण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या कमी होईल.नैसर्गिक वारसा जपला जाईल.अशा या स्वर्गीय बेटाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी या बेतला अवश्य भेट द्यावी
Juve Beach In Kokan Unseen