रेवदंडा किल्ला
मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज सर्वात धाडसी आणि महान योद्धे होते. महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी लहान वयातच मोठे पराक्रम गाजवत स्वराज्याची पायाभरणी केली. छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत मराठवाड्यातील सुमारे 360 किल्ले जिंकले. आज त्या किल्ल्यांची दुरावस्था झालीय हा एक वेगळा मुद्दा आहे. हे किल्ले जिंकण्यासाठी महाराजांना योग्य वेळ पाहत नियोजन करत मुघल सैन्याचा करेक्ट कार्यक्रम आखला आणि त्यांना पळवून लावले. हे किल्ले मुघलांनी काही सहजा सहजी सोडले नाहीत. अनेक मावळ्यांना जीवाची बाजी लावावी लागलीय. पण, एक किल्ला असाही भेटला की जो पोर्तूगिजांच्या तावडीतून स्वराज्यात आणायला मावळ्यांना दिड वर्षाचा कालावधी लागला. आजच्याच दिवशी १७४० मध्ये हा किल्ला मराठ्यांनी स्वराज्यात आणला.
त्या किल्ल्याचे नाव रेवदंडा किल्ला असून हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा गावात आहे. हा रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे असलेला एक प्राचीन पोर्तुगीज किल्ला आहे. रेवदंडा बीच हा एक वेगळा समुद्रकिनारा आहे आणि किल्ल्याजवळ आहे.
सहाव्या शतकात या ठिकाणी व्यापार वाढला होता. १० व्या शतकात निजामशाही नवाबांच्या राजवटीत हे एक महत्त्वाचे बंदर बनले. १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी देशात प्रवेश केला तेव्हा त्यांनी रेवदंडाची क्षमता व्यापारी दृष्टिकोनातून ओळखली आणि हा किल्ला हस्तगत केला.
चौल मध्ययुगीन काळात सुमारे २००० वर्षाआधी भोज आणि बिंबदेव या राजांनी राज्य केले होते. चौल १४ व्या शतकात, १५ व्या शतकात बहामनी सुलतान, १६ व्या शतकात निजामशाही, १६/१७ व्या शतकात पोर्तुगीज असे सुलतान येथे येऊन गेले. १५०८ मध्ये, इजिप्शियन मामलुक आणि गुजरात सुलतान यांच्या संयुक्त सैन्याने पोर्तुगीज सुलतानचा पराभव केला.
निजामशहाच्या परवानगीने १५२१ मध्ये पोर्तुगीजांची पहिली वसाहत सुरू झाली. १५७०-७१ आणि १५९४ मध्ये अनेक आक्रमणांपासून पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे रक्षण केले. १७४० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १८०६ मध्ये हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला.
रेवदंडा किल्ला